घरफोडी करणारी टोळी जेरबंद

 Govandi
घरफोडी करणारी टोळी जेरबंद

मुंबई - नशा करण्यासाठी परिसरातच घरफोडी करणाऱ्या चार आरोपींना दोन दिवसांपूर्वी देवनार पोलिसांनी गोवंडी येथून अटक केली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून, त्यांच्याकडून पोलिसांनी 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विजय यादव (19) हा या टोळीतील मुख्य आरोपी असून, तो गोवंडी परिसरातील राहणारा आहे. चौकशीत त्याने वनिता पाते आणि दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने परिसरात अनेक घरफोड्या केल्याचे कबूल केले असून, नशा करण्यासाठी या घरफोड्या करत असल्याची कबुली देखील या आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

Loading Comments