दादरमध्ये बसस्टॉप पडल्याने मुलगी जखमी

 Dadar (w)
दादरमध्ये बसस्टॉप पडल्याने मुलगी जखमी

दादर - येथील वीर कोतवाल उद्यान परिसरातील बसस्टॉप पडल्याने 15 वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास घडली. साक्षी प्रताप कनौजिया असं जखमी झालेल्या मुलीचं नाव असून, तिला उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाधर सोनवणे यांनी दिली.

फुटपाथवर पेव्हर ब्लॉकचे काम सुरु असल्याने बसस्टॉपचे मुख्य खांब उघडे पडले होते. दादरवरून वरळी, प्रभादेवी या दिशेने जाणाऱ्या बससाठी हा महत्त्वाचा स्टॉप असल्यामुळे लोकांची याठिकाणी विशेष गर्दी असते. गर्दीतील अनेक जण बसची वाट बघत या बसस्टॉपला टेकून उभे होते. भार वाढल्यामुळे हा बसस्टॉप खाली पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Loading Comments