ट्रकखाली येऊन क्लिनरचा मृत्यू

 wadala
ट्रकखाली येऊन क्लिनरचा मृत्यू
ट्रकखाली येऊन क्लिनरचा मृत्यू
See all

वडाळा - सिमेंट मिक्सर ट्रकच्या खाली आल्यानं क्लिनरला आपला जीव गमवावा लागला. ही घटना शनिवारी चुनाभट्टीच्या एसीसी सिमेंटच्या कंपनीमध्ये घडली. शिवा राममनोहर असं या क्लिनरचं नाव असून, तो सिमेंट मिक्सरच्या ट्रक क्लिनरचे काम करत होता. शनिवारी सकाळी सिमेंटचा मिक्स माल ठरलेल्या ठिकाणी सोडून आल्यावर कंपनीतल्या वॉश बेसिनजवळ ट्रक धुण्यासाठी थांबला होता. दरम्यान वाहन चालक सुनील कुमार गौतम याने क्लिनरला मागे जाऊन ट्रकचा मागील भाग साफ करण्यास सांगितले. ट्रकचा क्लिनर शिवा मागे गेला दरम्यान चालकाच्या गाफिलपणामुळे ट्रकचा हॅन्ड ब्रेक सुटला. मागे उतार असल्याने ट्रक विरूद्ध दिशेने जोरात निघाला आणि थेट वॉश बेसनिला धडकला. ट्रक धुणाऱ्या शिवाला काही कळायच्या आत तो ट्रक आणि वॉश बेसिनमध्ये अडकला. आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान किंचाळण्याचा जोराचा आवाज झाल्याने इतर कर्मचारी जमा झाले. त्यांनी ट्रक कसाबसा पुढे घेतला परंतु शिवा जागीच गतप्राण झाल्याने त्यांनी तात्काळ वडाळा टीटी पोलिसांना घटनास्थळी बोलावून ट्रक चालक सुनील गौतमला पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांचा अधिक तपास सुरू असून, त्यांनी चालकाला सिमेंट मिक्सर ट्रकसह ताब्यात घेतलं.

Loading Comments