'एप्रिल फूल'ची थट्टा महागात पडू शकते, गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश


'एप्रिल फूल'ची थट्टा महागात पडू शकते, गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
SHARES
दरवर्षीप्रमाणे जर यंदाही तुम्ही इतरांना एप्रिल फूल करण्याची स्वप्न रंगवत असाल तर स्वतःला जरा आवर घाला. याचं कारण असं की, जगभरासह भारतामध्ये देखील कोरोनाचे काळे ढग दाटून आले असून अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही अफवा पसरवल्या जाऊ नयेत यासाठी पोलीस प्रशासनाची सध्या समाज माध्यमांवर करडी नजर आहे.

1 एप्रिल 2020 रोजी एप्रिल फुल होऊ नका रस्त्यावर येऊ नका असे आवाहन गृहमंञी अनिल देशमुख यांनी नागरिकांना केले आहे . कोरोना या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना बाबत संभ्रमीत करणारे संदेश सोशल मीडियाद्वारे पसरवणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचेही देशमुखांनी यांनी स्पष्ट केले आहे.

1 एप्रिल निमित्त नागरिकांकडून वेगळ्या प्रकारचे मॅसेज एप्रिल फूल बनवण्याकरता टाकले जाऊ शकतात. जमाबंदी उठले आहे, सर्व लोक रस्त्यावर एकत्र यावे अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे. अशा एप्रिल फूल साठी सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजला कोणीही बळी पडू नये .अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन प्रशासनाच्या तसेच लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.जर अशा स्वरूपाचे मेसेज लोकाकडून सोशल मीडियावर व्हारल झाल्यास व्हायरल करणाऱ्यावर त्याचबरोबर ग्रुप ॲडमिनवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ग्रुप ॲडमिन ने आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना सूचना द्याव्यात. तसेच सेटिंग मध्ये जाऊन फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज सेंड करेल असे सेटिंग करावे. 

कोरोना संदर्भात किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशा अनुषंगाने केलेल्या मेसेजवर सायबर पोलिसांचे लक्ष आहे. असे मेसेज वायरल करणार्यांवर सायबर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृहमंञी अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा