Exclusive राज्यातील ७ हजार पोलीस 'क्वारंटाईन'

कोरोना बाधित पोलिसांची संख्या 116 ने वाढली असून सध्या 2211 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोना बाधित पोलिसांच्या संपर्कातील 7 हजार पोलिसांना सध्या क्वारनटाइन करण्यात आले आहे.

Exclusive राज्यातील ७ हजार पोलीस 'क्वारंटाईन'
SHARES
देशांत कोरोना संकटाने हाहाकार माजवला असून 24 तासात मुंबईतील आणखी दोन पोलिस या आजाराला बळी पडले आहेत. तर कोरोना बाधित पोलिसांची संख्या 116 ने वाढली असून सध्या 2211 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोना बाधित पोलिसांच्या संपर्कातील 7 हजार पोलिसांना सध्या क्वारनटाइन करण्यात आले आहे. या महामारीने आतापर्यंत पोलिस दलातील 25 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहितीला पोलिस उपायुक्त विनायक देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.

 

मुंबईत आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. दहिसर पोलिस ठाण्यात कार्यरत 53 वर्षीय हवालदाराचा मृत्यू झाला. 26 मेला त्यांचा मृत्यू झाला. त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करम्यात आले होते. मृ्त्यू होण्यापूर्वी दहा दिवस आधी ते सुटीवर गेले होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्यूनंतर करण्यात आलेल्या चाचणीत त्यांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. मृत पोलिस जोगेश्वरी येथील रहिवासी असून घरी पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. दुस-या घटनेत वांद्रे पोलिस ठाण्यात कार्यरत 53 वर्षीय पोलिसाचा मृत्यू झाला आहे.  चाचणीत त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर वरळीतील रुग्णालयात गेल्या 10 दिवसांपासून उपचार सुरू होते. गुरूवारी त्यांना रुग्णालयात घरी पाठवण्यात आले होते. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. ते वांद्रे पोलिस ठाण्याच्या तडीपार विभागात कार्यरत होते. सध्या परप्रांतीय मजुरांना पास देण्याचे काम करत होते.

राज्यात कोरोना मुक्त झालेल्या पोलिसांमध्ये 83 पोलीस अधिका-यांसह 887 पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. गेल्या चौवीस तासांत राज्यात 116 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या एक हजार 216 पोलिसांवर राज्यातील विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर सहा हजार  पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.  आतापर्यंत दोन हजार 211 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 249पोलीस अधिकारी आणि एक हजार 962 पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. तर त्यातील आतापर्यंत 970पोलीस कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत 1303 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 395 योद्ध्यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे चार हजार 448 पोलिसांना विलगीकरण करण्यात आले आहे. सध्या 165 पोलीस अधिकारी आणि एक हजार 51 पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापयर्यंत 25 पोलिसांना आपले जीव गमवावे लागले आहे. त्यातील मुंबई पोलीस दलातील आकडेवारी अधिक आहे. 

तसेच राज्यात पोलिसांच्या मदतीला केंद्रीय पथके दाखल करण्यात आली आहेत. मात्र या पथकातील जवान देखील कोरोनाच्या कचाट्यातुन सुटले नाहीत. आतापर्यंत 22 जवानाना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील दोन हजारांहून अधिक पोलिसांना कोरोना झाला आहे. तसेच संशयीत रुग्णाच्या संपर्कात आलेले सात हजार पोलिस विलगीकरणात आहेत. याशिवाय 55 वर्षावर्षीय पोलिसांना सुटीवर पाठवण्यात आले आहे. तसेच 50 वयोगटावरील पोलिसांना कमी जोखीमीचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी सध्या 10 हजार होमगार्ड, 1200 केंद्रीय सुरक्षा जवान देण्यात आले आहेत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा