Coronavirus LIVE update: निर्मलनगर पोलिस ठाण्यातील 8 पोलिसांना कोरोनाची बाधा

या 8 जणांच्या वांरवार संपर्कात असलेल्या 8 ते 9 जणांना ही पोलिसांनी क्वारंटाइन केलं आहे.

Coronavirus LIVE update:  निर्मलनगर पोलिस ठाण्यातील 8 पोलिसांना कोरोनाची बाधा
SHARES

 मुुंबईच्या जे.जे मार्ग पोलिस ठाण्यात 26 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईच्या निर्मलनगर पोलिस ठाण्यातील 8 जणांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे.  दोनच दिवसांपूर्वी या 8 पोलिसांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षण दिसून येत असल्यामुळे त्यांनी खासगी तपासणी केंद्रात तपासणी केली होती. या 8 पोलिसांवर सेव्हन हिल आणि गुरूनानक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


निर्मलनगर पोलिसांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. या ठिकाणी कोरोनाचे संशयित रुग्ण आढळून आले होते. कोरोनाची लागण झालेले पोलिसांपैकी  काही जण या परिसरातही बंदोबस्तासाठी तैनात होते. पोलिस या परिसरात सध्या बंदोबस्तासोबत नागरीकांना जेवण वाटपही करत आहेत. आपले कर्तव्य बजावत असताना हे पोलिस कोरोना बाधीत व्यक्तीच्या संपर्कात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या 8 जणांनी दोन दिवसांपूर्वी खासगी केंद्रात कोरोनाची तपासणी केली होती. शुक्रवारी या सर्वांचे रिपोर्ट हे पाँझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. या 8 जणांच्या वांरवार संपर्कात असलेल्या 8 ते 9 जणांना ही पोलिसांनी क्वारंटाइन केलं आहे.

आतापर्यंत मुंबईतील 250 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. काही दिवसांपूर्वीच वाकोला पोलिस ठाणे येथील 6, वडाळा पोलिस ठाण्यातील 9 आणि जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यातील 26 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले होते. तर राज्यभरात कोरोनाची बाधा झालेल्या पोलिसांची संख्या 557 वर जाऊन पोहचली आहे. तर आतापर्यंत चार पोलिस कर्मचाऱ्यांचा या आजाराने मृत्यू झालेला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा