सुटकेसमध्ये आढळला मृतदेह

कुर्ला - लोकमान्य टिळक टर्मिनसच्या परिसरात रविवारी संध्याकाळी एका लाल सुटकेसमध्ये 10 ते 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला. प्रत्यक्षदर्शी सुशील गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार एका लाल रंगाच्या सुटकेसमध्ये साडीत लपेटून हा मृतदेह या ठिकाणी फेकण्यात आला. काही स्थानिकांना हा मृतदेह दिसला असता त्यांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. घटनास्थळी टिळकनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला असल्याचं सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Loading Comments