मालेगाव ब्लास्टमधील आरोपीला जेलमध्ये मारहाण


मालेगाव ब्लास्टमधील आरोपीला जेलमध्ये मारहाण
SHARES

मुंबई - मालेगाव ब्लास्टचा आरोपी मनोहर नरवारीयाला जेलमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी विशेष एनआयए कोर्टानं चौकशीचे आदेश दिलेत. 2006 मध्ये झालेल्या मालेगाव ब्लास्ट प्रकरणी मनोहर नरवारीया हा आरोपी असून तो सध्या आर्थर रोडच्या जेलमध्ये आहे. नरवारीयाने आरोप केला आहे की, 2 डिसेंबरला जेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण केली होती.
विशेष एनआयए कोर्टानं मनोहर नरवारीयाचा जबाब नोंदवून जेल अधिकारी ए. एस पानसरे, एच. एस. मिंट, सचिन झिंझुर्डे आणि सुरक्षा रक्षक शिवाजी देवकर यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच जे. जे. रुग्णालयाचे डॉक्टर अमोल भिकने यांना देखील नरवारीयाच्या स्वास्थ्यासंदर्भातील सविस्तर रिपोर्ट न पाठवल्याबद्दल नोटीस बजावली आहे.
8 डिसेंबरला जेव्हा नारवारीयाला व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केलं तेव्हा त्याच्या दोन्ही हातांना प्लास्टर होतं, नरवारीयाच्या तक्रारीनंतर विशेष एनआयए कोर्टानं भोईवाडा कोर्टाच्या दंडाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा