ज्येष्ठ वकिलाच्या घरी लाखोंचा जुगार, आठ जणांना अटक

ज्येष्ठ वकिलाच्या घरात सुरू असलेल्या जुगारावर मुंबईच्या गुन्हे शाखेच्यापोलिसांनी शनिवारी कारवाई केली.

ज्येष्ठ वकिलाच्या घरी लाखोंचा जुगार, आठ जणांना अटक
SHARES

मुंबईतील ज्येष्ठ वकिलाच्या घरात सुरू असलेल्या जुगारावर मुंबईच्या गुन्हे शाखेच्यापोलिसांनी शनिवारी कारवाई केली. ज्येष्ठ वकिलाच्या घरात हे आठ जण पोकर जुगार खेळत होते.  या गुन्ह्यात पोलिसांनी आठ जणांना आतापर्यंत अटक केली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली आहे.

कफ परेड येथील एका फ्लॅटमध्ये पोकर जुगार खेळला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे प्रभारी पोलिस निरिक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ च्या पथकाने या फ्लॅटमध्ये छापा टाकला. या फ्लॅटमध्ये एका टेबलावर काही जण पोकर जुगार खेळत असल्याचे आढळले. या सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा फ्लॅट मुंबई उच्च न्यायालयातील एका ज्येष्ठ वकिलाचा असून हात वकिल हा जुगार चालवित असल्याचे उघड झाले. यासंदर्भात कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी वकिलासह आठ जणांना अटक केली. या फ्लॅटमधून २ लाख ७५ हजारांची रक्कम, पोकर खेळण्यासाठी लागणारे कॉइन, तसेच इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा