मुंबईत साडेसात कोटींचं रक्तचंदन जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सांताक्रूझ येथे दोन टेम्पोवर कारवाई करत तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १ हजार ५५६ किलोचे रक्त चंदन हस्तगत केले.

मुंबईत साडेसात कोटींचं रक्तचंदन जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
SHARES
मुंबईत गणेशोत्सव आणि मोहरमच्या बंदोबस्तात पोलिस व्यस्त असल्याचे पाहून कोट्यावधीच्या रक्त चंदनची तस्करी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी असगर इस्माईल शेख (४९) अली शेख (३२) व वाजिद अब्बा अन्सारी (३२) या तिघांना अटक केली आहे. या रक्त चंदनची किंमत साडेसात कोटी रुपये असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली.



गणेशोत्सवात  तस्करी

पश्चिम उपनगरातल्या सांताक्रूझ परिसरात एक टोळी रक्त चंदनाची तस्करी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सांताक्रूझ येथे दोन टेम्पोवर कारवाई करत तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १ हजार ५५६ किलोचे रक्त चंदन हस्तगत केले. हे रक्त चंदन चेन्नई येथील जंगलातून आणण्यात आलं होतं. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे रक्त चंदन परदेशात पाठवणार होते. त्या आधीच त्यांना अटक करून गुन्हे शाखेच्या कक्ष ९ च्या पोलिसांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा