ठाण्याच्या राबोडी परिसरातील बंद खोलीत सिलेंडरचा स्फोट ?


ठाण्याच्या राबोडी परिसरातील बंद खोलीत सिलेंडरचा स्फोट ?
SHARES

ठाण्याच्या राबोडी परिसरात केव्हीला शाळेजवळील देवदिप सोसायटीतील पहिल्यामाळ्यावरील खोलीत सिलेंडर स्फोट झाल्याची घटना सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. सुदैवाने या फ्लॅटमध्ये कुणीही नसल्यामुळे जिवीत हानी झालेली नाही.  या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचाः-चोरापासून तरुणीला वाचवलं मग स्वत:च लुटलं; लोकलमधील धक्कादायक प्रकार

ठाण्याच्या देवदिप सोसायटीच्या पहिल्यामाळ्यावरील रुम नं १०४ मध्ये स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजामुळे रहिवाशांची चांगलीच पळापळ झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी बाँम्बनाशक पथकालाही पाचरण केले. पोलिसांच्या चौकशीत हा फ्लॅट डेव्हिड सरोसे नावाच्या व्यक्तीचा असल्याचे निदर्शनास आले. हा फ्लॅट बंद असल्यामुळे यात जिवीत हानी झाली नाही. हा स्फोट नेमका कसा झाला हे अद्याप कळालेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर  अग्निशमन दलचे १ रेस्क्यू वाहन व १ जीप, राबोडी पोलीस निरिक्षक  व कर्मचारी, बॉम्ब शोध व निष्कसन पथक उपस्थित आहेत. सदर घटनेत  कोणालाही दुखापत झालेली नसून स्फोटाचे नेमके कारण अद्यप समजले नाही. प्राथमिक तपासात हा सिलेंडरचा स्फोट असल्याचे बोलले जाते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा