चोरापासून तरुणीला वाचवलं मग स्वत:च लुटलं; लोकलमधील धक्कादायक प्रकार


चोरापासून तरुणीला वाचवलं मग स्वत:च लुटलं; लोकलमधील धक्कादायक प्रकार
SHARES

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या तरूणीला एका प्रवाशानं सोनसाखळी चोरापासून वचवलं, मग स्वत:च लुटल्याचा धक्कादायक प्रकार पश्चिम रैल्वे मार्गावर घडला. मंगळवारी रात्री उशिरा कांदिवलीला आपल्या भावाला भेटण्यासाठी तरूणीने बोरिवलीहून ११ वाजून ४४ मिनिटांची लोकल पकडली. ती लोकलच्या जनरल डब्ब्यात चढली असता संपूर्ण डब्ब्यात सामसूम होती. केवळ एक रहिम शेख नावाचा ३२ वर्षीय तरूण डब्ब्यात झोपलेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवलीहून ट्रेन सुटण्याआधी एक तरूण लोकलमध्ये चढला. त्या ३२ वर्षीय तरूणाचे नाव ओमप्रकाश दिक्षित असल्याचे समजतं. ओमप्रकाशने डब्ब्यात घुसताच त्या तरूणीच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि तिने परिधान केलेला सोन्याचा नेकलेस व मोबाईल देण्यास सांगितलं.

तरूणीचं रडणं ऐकून उठलेल्या रहीम शेखने दिक्षितशी २ हात करत त्याला डब्ब्यातून हाकलून लावले. तसेच, 'तु माझ्या बहिणीसारखी आहेस. तुला कोणताही धोका नाह'’, असे रहीमने तिल सांगितलं.

बोरिवली स्टेशनवरून ट्रेन सुटताना रहीमने दिक्षितला हाक मारून परत डब्ब्यात बोलवून घेतले. त्यानंतर बोरिवली ते कांदिवली स्टेशनांदरम्यान, रहीमने त्या तरूणीशी वाईट वर्तणुक केली. तिचे दागिने आणि मोबाईलदेखील लुटलं. हा प्रकार घडत असतानाच तरूणीने अलार्मची चेन खेचली आणि तितक्यात कांदिवली स्टेशन आल्याने दोघेही डब्ब्यातून उतरून पसार झाले. अलार्मच्या आवाजामुळे स्थानिक रेल्वे पोलिसांनी चपळाई दाखवत दिक्षितला लगेचच पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांच्या आधारावरून एक स्केच तयार करून घेण्यात आले. त्यानंतर विविध तुकड्या कांदिवली आणि आसपासच्या परिसरात पाठवण्यात आल्या. रहीम शेख हा अंमली पदार्थांचे सेवन करणारा तरूण असल्याची माहिती मिळते. त्यानुसार रहीमला कांदिवली पश्चिम येथून अटक करण्यात आली.

रहीम शेख आणि दिक्षित एकमेकांना आधीपासून ओळखत नव्हते. तरूणीला वाचवण्याचं रहीमने केवळ नाटक केलं होतं. त्यानंतर तरूणीला लुटण्याची संधी असल्याचं पाहिल्यावर त्याने पटकन दिक्षितला बोलावून घेतलं होते.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा