नराधम बापानंच केला मुलीवर बलात्कार

अंधेरी - डी.एन.नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलीय. एका नराधम बापाने आपल्या 7 वीत शिकणाऱ्या मुलीवर वर्षभर बलात्कार केल्याचं समोर आलंय. जीवे मारण्याची आणि आईला सोडून द्यायची धमकी देत या नराधमाने मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी बापाला अटक केलीय. 

मुलीने घडलेली सर्व घटना आपल्या शिक्षकाला सांगितली. शिक्षकाने एका एनजीओला याबाबतीत माहिती दिली. त्यानंतर संबंधित एनजीओने डी.एन.नगर पोलिसांना हे प्रकरण सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत आरोपीला अटक केली. जेव्हा मुलीची आई कामानिमित्त बाहेर जायची तेव्हा मुलीचा बाप तिच्यावर अत्याचार करायचा आणि जीवे मारण्याची धमकी द्यायचा. आरोपी गेल्या 10 वर्षांपासून डी.एन.नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होता.

Loading Comments