इक्बाल मिर्चीच्या घराचा मंगळवारी लिलाव

भायखळा येथील रोशन हाऊस चिञपटगृह, क्राफर्ड मार्केचमध्ये तीन गाळे, जुहू तारारोडवरील मिनाज हाँटेल, पाचगणी येथे बंगला अशा 500 कोटींच्या मालमत्तांवर ईडीची नजर आहे.

इक्बाल मिर्चीच्या घराचा मंगळवारी लिलाव
SHARES

इक्बाल मिर्चीच्या वादग्रस्त मालमत्तेचा आज ईडीकडून  (स्मगलर्स  अँड फाँरन  मँनिप्युलेटर्स  आँथीरिटीमार्फत)सफेमानुसार या मालमत्तेचा लिलावा करण्यात येणार आहे. लिलावा करण्यात येणाऱ्या मालमत्तेची किंमत तीन कोटी रुपये इतकी आहे.

जुहूतारा रोड येथे इक्बाल मिर्चीचे दोन अलिशान फ्लँट आहेत.  सध्या या दोन्ही फ्लँटची किंमत तीन कोटी 45 लाख इतकी आहे. या दोन्ही फ्लँटचा लिलावा आज सफेमाच्या नरीमन पाँईट येथील कार्यालयात होणार आहे. काही महिन्यांपूर्वी याच सफेमाच्या कार्यालयात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा लिलावा करण्यात आला होता. या प्रकरणी ईडीने (अंमलबजावणी सक्तवसुली संचालनालयानं) उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला समन्स बजावले आहे. राज कुंद्राला चौकशीसाठी ४ नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. दिवसेंदिवस या व्यवहारात अनेक मोठमोठ्या व्यक्तींची नावे समोर येऊ लागल्यामुळे राज कुंद्रा यांच्या ईडी चौकशीत काय निष्पन्न होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 1994 साली पोलिसांनी मिर्चीला तडीपार म्हणून घोषीत केले. त्यावेळी तो दाऊदचा अंमली पदार्थ तस्करीचा व्यवसाय संभाळायचा. कालांतराने मिर्चीने भारतातून पळ काढला. त्याला पकडण्यासाठी  इंटरपोलने ही नोटीस काढण्यात आली.

सौदी अरेबीया येथे जाऊन लपलेला मिर्ची कालांतराने कुटुंबासोबत लंडन येथे स्थायिक झाला. त्या ठिकाणी तो लिगल इस्टेटचा व्यवसाय करू लागला. माञ 14 आँगस्ट 2013 रोजी त्याचा मृत्यू झाला. मुंबईत त्याच्या व त्याच्या कुटुंबियांच्या नावे पाच मालमत्ता असल्याचे कुटुंबियांच्या चौकशीतून पुढे आले होते. यातील दोन मालमत्ता मेसर्स सनब्लिक  व मिलेनियम डेव्हलपर्स प्रा.लि.यांना विकण्यात आल्या. वरळीत 2011 मध्ये सनब्लिक रिअल्टर्सला विकण्यात आल्या. 

सिजय हाऊस ही 15 मजली  मिर्ची व मिलेनियम डेव्हलपर्स यांनी संयुक्तरित्या 2007 मध्ये बांधली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील दोन फ्लँट मिर्चीच्या कुटुंबियांच्या नावावर 2007 मध्ये करण्यात आले आहेत. त्या शिवाय मेमर्स व्हाईट वाटर लि.च्या नावाने खंडाळ्यात सहा एकर जमीन देखील खरेदी करण्यात आली आहे.त्याचा ताबा मिर्चीच्यी दोन मुलांकडे आहे. त्याच बरोबर साहिल नावाचा बंगला त्याची पत्नी आणि मुलाच्या नावावर आहे. तर वरळीतील समंदर महल येथील मालमत्ता मेव्हणा आणि बहिणीच्या नावावर आहे. त्या व्यतिरिक्त भायखळा येथील रोशन हाऊस चिञपटगृह, क्राफर्ड मार्केचमध्ये तीन गाळे, जुहू तारारोडवरील मिनाज हाँटेल, पाचगणी येथे बंगला अशा 500 कोटींच्या  मालमत्तांवर ईडीची नजर आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा