राणा कपूरला 11 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

राणा कपूर यांच्या राजकीय कनेक्शनवरूनही राजकारण तापलं

राणा कपूरला 11 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
SHARES

आर्थिक संकटात आलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) शनिवारी रात्री अटक केली. तब्बल 34 तासाच्या चौकशीनंतर ईडीने राणाकपूरला अटक केली आहे. न्यायालयाने राणा कपूरला 11 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ईडीच्या चौकशीत राणाने प्रियांका गांधींचे एक चिञ 2 कोटींना खरेदी केल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे राजकिय वातावरण ही तापलेलं आहे.

येस बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर ईडीनं शुक्रवारी रात्री बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाईनंतर राणा कपूर यांना चौकशी ईडीनं ताब्यात घेतलं. शनिवारी दिवसभर म्हणजेच 34 तासाच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली. कपूर यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली असून, न्यायालाने राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दुसरीकडे राणा कपूर यांच्या राजकीय कनेक्शनवरूनही राजकारण तापलं आहे. भाजपने शुक्रवारी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यासोबत राणा कपूर यांचे फोटो दाखवून काँग्रेसला लक्ष्य केले होते. त्यातच प्रियांका गांधी यांचे पेंटिंग राणा कपूर यांनी खरेदी केल्याची माहिती पुढे येत आहे. यूपीए सरकारच्या काळात राणा कपूर यांनी २ कोटी रुपयांना हे पेंटिंग खरेदी केले होते, अशी खात्रीशीर माहिती असून आयटी विभागाने याची चौकशी सुरू केली आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा