पीएनबी घोटाळा: मेहुल चोकसीची १२१७ कोटींची मालमत्ता जप्त


पीएनबी घोटाळा: मेहुल चोकसीची १२१७ कोटींची मालमत्ता जप्त
SHARES

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आतापर्यंत अंमलबजावणी संचलनालया (ईडी)ने जप्त केली आहे. एवढ्यावरच न थांबना ईडीने आपला मोर्चा मेहुल चोकसीवर वळवला आहे. त्यानुसार ईडीने मेहुलच्या ४१ मालमत्तांवर कारवाई करत, १२१७ कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे.



किती मालमत्ता जप्त?

नीरव मोदीचा मामा आणि व्यवसायातील भागीदार मेहुल चोकसी याच्या गीतांजली नक्षत्र आणि जिली अशा तीन कंपन्यांच्या मालमत्तांवर ईडी छापे टाकत आहे. ईडीने कारवाई करत चोकसीची १५ आलिशान घरं, १७ कार्यालय, कोलकातामधील शाॅपिंग माॅल, अलिबागमधील फार्म हाऊस आणि महाराष्ट्रातील २३१ एकर जमिनीचा समावेश आहे.


इंटरपोल सतर्क

सध्या फरार असलेले पीएनबी गैरव्यवहारातील मुख्य सूत्रधार नीरव मोदी, त्याची पत्नी अॅमी, भाऊ निशाल आणि गीतांजलीचे प्रमोटर मेहुल चाेकसी यांना पकडण्यासाठी इंटरपोललाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या चौघांविरोधात 'इंटरपोल डिफ्युजन नोटीस' जारी करण्यात आली असून त्यांचे पासपोर्टही रद्द करण्यात आले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा