'या' आलिशान कार्समध्ये फिरायचा नीरव, 'ईडी'ने केल्या जप्त

आतापर्यंत 'ईडी'ने नीरवच्या देशभरातील २९ मालमत्ता जप्त केल्या असून त्यामध्ये ५ हजार ६०० कोटी रुपयांच्या मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे. हे दागिनेही कमी कॅरेटचे असल्याचं तपासात पुढे आल्याने दागिन्यांची मूळ किंमत आता 'ईडी' तपासत आहे.

'या' आलिशान कार्समध्ये फिरायचा नीरव, 'ईडी'ने केल्या जप्त
SHARES

पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयकडून धाडी टाकण्याचं सत्र सलग ९ व्या दिवशी देखील कायम आहे. त्यानुसार 'ईडी'ने मंगळवारी रात्री उशीरा आणि गुरूवारी नीरव मोदी तसंच त्याच्या कंपनीच्या नावे असलेल्या ९ आलिशान कार्स वरळी येथील घर आणि अलिबागमधील फार्म हाऊस इथून ताब्यात घेतल्या आहेत. सोबतच ईडीने त्याचे कोट्यवधी रुपयांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड देखील गाेठवले आहेत.किती मालमत्ता जप्त?

'ईडी'तील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार रात्री आणि गुरूवारच्या कारवाईत 'ईडी'ने नीरव मोदी याच्या ९ आलिशान कार्स जप्त केल्या. यामध्ये १ रोल्स राॅईस गोस्ट, २ मर्सडीज बेन्झ जीएल ३५० सीडीआय, १ पोर्शे पनोरमा, ३ होंडा, १ टोयोटा फाॅर्च्यूनर आणि १ टोयोला इनोव्हा या कार्सचा समावेश आहे. या कार्सची किंमत ८९ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.

  • सोबतच 'ईडी'ने त्याचे ७.८० कोटी रुपयांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स देखील गोठवले आहेत.
  • मेहुल चोकसी ग्रुपच्या ८६.७२ कोटी रुपयांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड 'ईडी'ने गोठवले आहेत.
  • याअगोदर बुधवारी सीबीआयने अलिबागमधील नीरव मोदीचं फार्म हाऊस सील केलं होतं. हे फार्म हाऊस १.५ एकर क्षेत्रफळाचं आहे. या फार्म हाऊसचं नाव 'रोपन्या' असं आहे.२९ मालमत्तांचा समावेश

आतापर्यंत 'ईडी'ने नीरवच्या देशभरातील २९ मालमत्ता जप्त केल्या असून त्यामध्ये ५ हजार ६०० कोटी रुपयांच्या मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे. हे दागिनेही कमी कॅरेटचे असल्याचं तपासात पुढे आल्याने दागिन्यांची मूळ किंमत आता 'ईडी' तपासत आहे.कमी किंमतीचे दागिने?

नीरवने त्याच्या शोरुममध्ये कमी दर्जाचे दागिने ठेवल्याचं आढळून आलं आहे. त्यावर स्वत:च्या ब्रँन्डचा टॅग लावून ते चढ्या किंमतीत विकायचा. त्यामुळे ताब्यात घेण्यात आलेल्या दागिन्यांची मूळ किंमत अर्धाहून कमी असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. हे पाहता केवळ ग्राहकच नव्हे, तर तपास यंत्रणानाही नीरवने गंडवल्याचं स्पष्ट होत आहे.


पेंटींग्जही बनावट

नीरवच्या घरातून महागड्या पेंटींगही हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यात फ्रान्सिस सोऊजा, अमृता शेरगील, भारती खेर, व्ही. एस. गायतोंडे, अकबर पदमसी, राजा रवी वर्मा, रवींद्रनाथ आणि मकबूल फिदा हुसैन यांच्या पेटींगचा समावेश आहे. या पेंटींग्जही बनावट असल्याचा देखील तपास यंत्रणांना संशय आहे. त्या दृष्टीने 'ईडी' सत्यता पडताळून पाहात आहेत. अशा महागड्या पेंटींग्ज नीरव त्यांच्या विशेष ग्राहकांना देऊन स्वत: कडे आकर्षित करून घ्यायचा असं सूत्रांकडून कळत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा