सायनमध्ये आठ वर्षीय मुलीवर बलात्कार


सायनमध्ये आठ वर्षीय मुलीवर बलात्कार
SHARES

सायन - प्रतीक्षानगर येथे राहणाऱ्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्याला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास या मुलीवर बलात्कार करण्यात आला. या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या घटनेनंतर परिसरातल्या रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरलीय. आरोपीला अटक करताच परिसरातल्या रहिवाशांनी प्रतिक्षानगर पोलीस स्टेशनबाहेर एकच गर्दी केली. रहिवाशांनी पोलीस स्टेशनबाहेर गर्दी करू नये, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा