इन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायकला कोर्टाचा दिलासा


इन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायकला कोर्टाचा दिलासा
SHARES

इन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी 'एसीबी'च्या विशेष कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टाने मंजूर केला असून आता दया नायक यांच्यावर कुठलाही खटला चालणार नाही. यापूर्वी २०१० मध्ये देखील पोलिसांनी कोर्टाला क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र त्यावेळी कोर्टाने हा रिपोर्ट फेटाळून लावत पुन्हा चौकशीचे आदेश दिले होते. आता ७ वर्षांनंतर कोर्टाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे.


क्लोजर रिपोर्ट स्वीकारला

लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी)ने आॅगस्ट २०१० मध्ये दया नायकविरोधात बेहिशेबी संपत्तीविरोधात विशेष कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. या रिपोर्टमध्ये दया नायक यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कुठलेही पुरावे सापडले नसल्याचं नमूद करण्यात आलं होतं. परंतु कोर्टाने हा रिपोर्ट स्वीकारण्यास नाकारत याप्रकरणी पुन्हा चौकशीचे आदेश दिले. मात्र ७ फेब्रुवारी रोजी एसीबीने पुन्हा सादर केलेल्या रिपोर्टला कोर्टाने स्वीकारलं आहे.



कशावर आक्षेप?

दया नायक यांचा कांदिवलीतील चारकोप इथं ८०० चौ.फुटांचा एक फ्लॅट, जीप आहे. सोबतच दया नायक यांनी आपल्या गावी शाळा बनवण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी दान केल्याचंही म्हटलं जात होतं. त्यांच्यावर बनावट कंपन्यांद्वारे काळ्या पैशाला पांढरा करण्याचा आरोप देखील लावण्यात आला होता. याचप्रकरणी त्यांना २००६ मध्ये पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं.

एसीबीच्या मते, दया नायक यांच्या सर्व संपत्तीच्या स्त्रोतांची माहिती मिळाली असून त्यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. दया नायकने आतापर्यंत ८० हून अधिक इन्काऊंटर केले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा