corona virus : धक्कादायक! कोरोना व्हायरसच्या नावाखाली फसवणूक

हँड सॅनिटायजर्स' आणि 'मास्क' ची वाढता मागणी लक्ष्यात घेता काही विक्रेते ते चढ्या भावाने विकत असल्याचं दिसून आलय.

corona virus : धक्कादायक! कोरोना व्हायरसच्या नावाखाली फसवणूक
SHARES
देशभरात कोणाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सुरक्षा म्हणून त्यावर योग्य ती काळजी घेण्याचे काम सुरू आहे. शासकीय यंत्रणा सुद्धा लोकांना सुरक्षित राहण्यासाठी योग्य ते काळजी घेण्याचा आवाहन करत आहेत त्याचबरोबर पूर्ण यंत्रणा सध्या कामाला लागलेले आहे मात्र काहीजण या आजाराचा फायदा घेऊन लोकांना फसवत असल्याचं सुद्धा समोर येतय. मुंबईतल्या वडाळा पोलिसांनी अशाच एका आरोपीला अटक केलेली आहे जो मास्कची ठरलेली विक्रीची डिल न करता फिर्यादी व्यक्तीची लाखो रुपयांची फसवणूक करत होता.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वापरण्यात येणाऱ्या मास्क चा सध्या तुटवडा निर्माण झालाय. 'हँड सॅनिटायजर्स' आणि 'मास्क' ची वाढता मागणी लक्ष्यात घेता काही विक्रेते ते चढ्या भावाने विकत असल्याचं दिसून आलय. या प्रकरणातील फिर्यादी नवीनचंद्र भनोचा यांचा सद्गुरू इम्पेक्स नावाचा कामगारांचे गणवेश बनवून त्याची परदेशात विक्री करण्याचा व्यवसाय आहे. मुंबईतल्या वडाळा परिसरात ते हा व्यवसाय चालवतात. जगभरात कोरोनाने थैमान घातल्याने फ्रांस आणि ओमान या देशातून फिर्यादीच्या सद्गुरू इम्पेक्स या कंपनीकडे तोंडाला लावनाऱ्या मास्कची मागणी करण्यात आली होती त्यानुसार ती स्वीकारून फिर्यादीने गुगलवर मास्क विक्क्रीची जाहिरात शोधली त्यामध्ये भक्ती इंटरप्रायझेस ही कंपनी मास्क विकत असल्याचे दिसताच त्याची सर्व कागदपत्रे त्यांनी आरोपीकडून मागून घेतली ज्यामध्ये  आयएसओ सर्टिफिकेट आणि जीएसटीच्या कागदपत्रांचा समावेश होता..ते तपासून फिर्यादीने खात्री पटताच जवळपास 14 लाख 40 हजार रुपये किमतीचे 1 लाख 60 हजार मास्क हवे असून त्याची ऑर्डर संबंधित कंपनीला दिली होती. त्यासाठी ऍडव्हान्स म्हणून ऑनलाईन पे पद्धतीचे माध्यमातून जवळपास 4 लाख रुपये आरोपीच्या खात्यावर टाकण्यात आले होते.

सर्व व्यवहार होऊनसुद्धा समोरच्या कंपनीने मास्कचा पुरवठा न केल्याने आणि पैशांची परतफेडसुद्धा न झाल्याने फिर्यादी नवीनचंद्र भनोजा यांनी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला.तपासादरम्यान आरोपीने इंडिया मार्ट या वेबसाईटवर भक्ती इंटरप्रायझेस या नावाने बनावट वेबसाईट काढून बनावट कागदपत्रे तयार करून स्वतः मास्क विक्री करत असल्याचा बनाव केल्याचे सिद्ध झाले..तांत्रिक माहितीच्या आधारे वडाळा पोलिसांच्या पथकाने आरोपी बोदले अब्रार मुसताफ याला जे जे मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन अटक केलेली आहे. मास्क च्या नावाखाली फिर्यादीचा फसवणूक केल्याप्रकरणी त्याला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय मात्र अश्या प्रकारे त्याने आणखी बऱ्याच जणांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येतीय त्या दृष्टीने वडाळा पोलीस तपास करत आहेत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा