Advertisement

भायखळ्यातल्या आगीवर नियंत्रण


SHARES
Advertisement

भायखळा - मंगळवारी रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी भायखळा इथल्या बदलू रंगारी मार्ग आणि मेघराज सेठी मार्गाच्या नाक्यावरील झोपडपट्टीला आग लागली. आग लागतच एका मागून एक असे पाच सिलिंडर ब्लास्ट झाले. स्थानिकांनी दूरध्वनी करून अग्निशमन दलाला याची माहिती दिली. घटनास्थळी 14 फायर इंजिन, 10 वॉटर टँकर आणि 5 जंबो टँकर दाखल झाले. आगीमध्ये कुठलीच जिवीतहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवतांना अग्नीशमन अधिकारी अशोक बने यांना किरकोळ स्वरूपात इजा झाली. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरुयेत. तब्बल चार तासाच्या प्रयत्नानंतर रात्री 2 वाजून 20 मिनिटांनी अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. आग कश्यामुळे लागली हे अद्याप कळू शकलं नाही.

संबंधित विषय
Advertisement