एमसीसी महाविद्यालयातील कॉम्प्युटर लॅबला आग

 Dalmia Estate

See all

मुलुंड - मुलुंड पश्चिमेकडील मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयातील कॉम्प्युटर लॅबला बुधवारी आग लागली. दुपारी 12.45 च्या दरम्यान लॅब मधील वातानुकूलित यंत्रामध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली. त्यानंतर ताबडतोब महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कॉलेज मधून बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. वरिष्ठ अधिकारी एस.ओ. जाधव यांच्या निर्देशनाखाली 30 ते 40 मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून कॉम्प्युटर लॅब मधील लाकडी सामान तसेच 20 संगणक आणि एक वातानुकूलित यंत्र एवढे नुकसान झाले आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांनी दिली.

Loading Comments