कुर्ल्यातील मेंदाडकर रुग्णालयात आग

 Nehru Nagar
कुर्ल्यातील मेंदाडकर रुग्णालयात आग

नेहरुनगर - कुर्ल्यातील नेहरुनगर परिसरात असलेल्या मेंदाडकर रुग्णालयात रविवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक आग लागली. लहान मुलांसाठी असलेल्या या रुग्णालयात घटनेच्या वेळी चार ते पाच मुले उपचारासाठी दाखल होती. मात्र आगीची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ या मुलांना बाजूच्या रुग्णालयात हलवले. त्यानंतर अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच अवघ्या १० मिनिटात ही आग आटोक्यात आणण्यात दलाला यश आलं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून, यामध्ये कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती चेंबूर अग्निशमन दलानं दिलीय.

 

Loading Comments