वडाळा मुंडण प्रकरण : ४ शिवसैनिकांना अटक

तिवारी याचं मुंडण करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यामुळे तिवारीने पोलिसांकडं तक्रार नोंदवली.

वडाळा मुंडण प्रकरण : ४ शिवसैनिकांना अटक
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या राहुल उर्फ हिरामण तिवारी या तरुणाला वडाळा येथे शिवसैनिकांनी मारहाण केली होती. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी समाधान जुगदार, प्रकाश हसबे, सत्यवान कोलंबेकर, श्रीकांत यादव यांना अटक केली आहे. 

नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर वडाळा येथील राहुल उर्फ हिरामण तिवारी याने फेसबुकवर पोस्ट लिहून टीका केली. त्यामुळे शाखाप्रमुख समाधान जुगदर, प्रकाश हसबे, सत्यवान कोलंबेकर, श्रीकांत यादव यांनी तिवारी याला मारहाण करत त्याचं मुंडण केलं होतं.

तिवारी याचं मुंडण करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यामुळे तिवारीने पोलिसांकडं तक्रार नोंदवली. पोलिसांनी बुधवारी चौघांविरोधात गुन्हा नोंदवला होता.गुरूवारी आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणात दखलपात्र गुन्हा नोंदवावा, आरोपींना अटक  करावी या मागणीसाठी माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार तामिळ सेलवन यांनी बुधवारी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं होतं. 




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा