महिलेला घरी बोलावून सामूहिक बलात्कार

  Kalyan
  महिलेला घरी बोलावून सामूहिक बलात्कार
  मुंबई  -  

  पैसे देण्याचा बनाव करून मित्राच्या बायकोला घरी बोलावून एका नराधमाने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना कल्याणजवळच्या द्वारली गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

  धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार करणारे दोन्ही आरोपी मुंबईच्या बेस्ट बसचे चालक असून उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. सुनील मोरे आणि अरविंद कुंभार अशी आरोपींची नावं आहेत. सुनील याने त्याच्या मित्राच्या बायकोला पैसे घेण्यासाठी घरी बोलावले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराचे चित्रीकरण अरविंद याने केले. या प्रकरणी पीडित महिलेने हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.