कुंभारवाड्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार

 Kumbharwada
कुंभारवाड्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार

कुंभारवाडा - पायधुणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारंगी इमारतीत एका 25 वर्षीय मुलीवर गुरुवारी रात्री तिघांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. फारुख खान, संतोष कनोजिया आणि अकबर अशी या तिघांची नावे आहेत.

या तिघा नराधमांनी त्या मुलीला सारंगी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर डांबून ठेवले होते. नराधमांच्या तावडीतून तिने कसाबसा पळ काढला आणि तिथल्या शौचालयात जाऊन लपली. जीव वाचवण्यासाठी तिने त्या शौचालयाच्या खिडकीतून उडी मारली. यामुळे ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पीडित मुलीची परिस्थीती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित मुलगी ही उत्तर प्रदेशची राहणारी आहे. बलात्कार करणाऱ्या तिघांपैकी एकाची ती मैत्रीण होती. भिंवडीत गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघे एकत्र राहत होते. मुंबईत कामाला लावतो असं या तिघांनी तिला दाखवलं होतं अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Loading Comments