आईच्या हत्येप्रकरणी मुलाला अटक

आईचे दागिने गहाण ठेवले. त्यातून आलेल्या पैशातून त्याने आपली गहाण ठेवलेली स्कूटर सोडवून आणली, तर काही पैसे मैत्रिणीला दिले.

आईच्या हत्येप्रकरणी मुलाला अटक
SHARES

घाटकोपरच्या विद्याविहार येथे आढळून आलेल्या महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या मुलालाच अटक केली आहे. मोहम्मद सोहेल शफी शेख (३३) असे या आरोपीचे नाव आहे.  शेखने आईची हत्या करून तिची ओळख न पटावी या उद्देशाने मृतदेहाचे तुकडे करून विद्याविहारच्या नाल्यात टाकला होता.

कुर्ला पश्चिम येथील महाजनवाडीत सोहेल आईसोबत रहात होता. २८ डिसेंबरला आईसोबत झालेल्या क्षुल्लक वादावरून सोहेलने घरीच गळा दाबून तिचा खून केला होता. यानंतर त्याने हा मृतदेह घरीच ठेवला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ डिसेंबरला त्याने आईचे दागिने गहाण ठेवले. त्यातून आलेल्या पैशातून त्याने आपली गहाण ठेवलेली स्कूटर सोडवून आणली, तर काही पैसे मैत्रिणीला दिले.

यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शीर आणि दोन पाय धडापासून वेगळे केले. चादरीमध्ये धड गुंडाळून त्याने ते विद्याविहार परिसरात नेऊन टाकले. तर, शीर हे कुर्ला कारशेड येथे टाकले. दोन पाय त्याने कुर्ला परिसरातच टाकले होते. घाटकोपर पोलिसांनी कसून शोध घेत या प्रकरणाचा छडा लावला, आणि सोहेलला अटक केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा