मरीन ड्राइव्ह परिसरात आढळला तरुणीचा मृतदेह


मरीन ड्राइव्ह परिसरात आढळला तरुणीचा मृतदेह
SHARES

चर्चगेट येथील ओव्हल मैदानात एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. नसरीन शेख असं या तरुणीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून तिची हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी सलमान शेख याला अटक केली आहे.


संपूर्ण प्रकार

कुर्ला परिसरात राहणारी नसरीन आझाद मैदान परिसरातीस चाय पे चर्चा या कॅफेत नोकरी करत होती. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे नसरीन कामावर गेली होती. मात्र संध्याकाळ झाली तरी ती घरी न परतल्याने तिचे वडील नसरीनचा मित्र सलमाच्या घरी गेले. मात्र त्यानेही आपल्याला तिच्याबद्दल माहीत नसल्याचं सांगितले. त्यानंतर दोघेही तिला शोधत तिच्या कामाच्या ठिकाणी गेले. तिथेही ती दिसून न आल्यानं दोघांनी आझाद मैदान पोलिस ठाणे गाठलं.

त्याचवेळी एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात आल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. अनोळखी व्यक्तीने चाकू भोसकून तिची हत्या केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस तपासात नसरीनची हत्या सलमाननेच केल्याचं सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. नसरीनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जीटी रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांचा तपास सुरू आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा