लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला प्रवाशांनी चोपलं


लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला प्रवाशांनी चोपलं
SHARES

लोकलमधील गर्दीचा फायदा उचलत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या विकृताला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचं नाव अविजीत सिंग (२९) असं असून तो तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत, हस्तमैथून करत होता. वेळीच ही बाब मुलीने इतर प्रवाशांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सहप्रवाशांनी त्याला चोप देत अंधेरी पोलिसांच्या हवाली केलं.


सहप्रवाशांनी चोपलं

अंधेरी परिसरात रहात असलेली २४ वर्षीय तरुणी ही बोरिवली येथे ब्युटी पार्लमध्ये काम करते. रविवारी सकाळी पीडित तरुणी ही आपल्या नातेवाईकांसोबत विरारच्या जिवदानी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. विरारहून तिने सीएसटीला जाणारी संध्याकाळी ५ वाजताची लोकल पकडली. रविवारी मेगा ब्लाॅक असल्यामुळे रेल्वेच्या डब्यात गर्दी होती.

बोरिवली स्थानक आल्यानंतर अंधेरीला उतरण्यासाठी पीडित मुलगी रेल्वे डब्याच्या दरवाजावर उभी राहिली. त्यावेळी दरवाजाजवळ उभा असलेल्या अविजीत तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. मात्र गर्दी असल्यामुळे अविजीतचा चुकून स्पर्श होत असल्याचं समजून तरुणीने त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र कालांतकाराने तिच्या हाताजवळ अविजीत लिंग काढून हस्तमैथून करत असल्याचं जाणवल्यानंतर घाबरून तिने आरडाओरडा केला. इतर प्रवाशांचे अविजीतकडे लक्ष गेलं असता अविजीतच्या पँटची चैन उघडी असल्याचं निदर्शनात आलं. त्यावेळी सहप्रवाशांनी अविजीतला चोप देत अंधेरी पोलिसांच्या हवाली केलं. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा