सरकार पाडण्यासाठी IPS अधिकाऱ्यांनी रचला कट, हे मी बोललोच नाही – गृहमंत्र्यांचा खुलासा

राज्यातील काही आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला.

सरकार पाडण्यासाठी IPS अधिकाऱ्यांनी रचला कट, हे मी बोललोच नाही – गृहमंत्र्यांचा खुलासा
SHARES

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजप नेत्यांसह काही IPS अधिकाऱ्यांना कट रचल्याचा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याची बातमी एका वृत्तपत्राने छापली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुलासा केला आहे. अशाप्रकारचे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही. माझ्या तोंडी हे वक्तव्य चुकीच्या पध्दतीने टाकले असल्याचा खुलासा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.   

हेही वाचाः- राज्यातील  कोरोना बाधीत कैद्यांचा आकडा २ हजारच्या पार

 अनिल देशमुख यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे म्हटले की, राज्यातील काही आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी  सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी होऊन गेल्या पण आता यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करु इच्छित नाही, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी दिलेल्या मुलाखतीत केल्याचा दावा वृतपत्राने केला. या वृत्ताने एकच खळबळ उडाली असून त्याची चर्चा सध्या सुरू होती. या वृत्तानंतर देशमुख हे वाचाळवीर असल्याची टिका भाजप नेत्यांकडून करण्यात आली.  

हेही वाचाः- सोरिअ‍ॅसिस रुग्णांनी 'अशी' घ्या त्वचेची काळजी

या वृत्ताची गंभीर दखल देशमुख यांनी घेतली.  राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न केले आहेत, असे मी म्हटल्याचे एका वृत्तपत्राने प्रसिध्द केले आहे. मात्र, अशाप्रकारचे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही. माझ्या तोंडी हे वक्तव्य चुकीच्या पध्दतीने टाकले असल्याचा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात अनौपचारिक भेट देशमुख यांनी दिली. अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचा इन्कार करताना देशमुख म्हणाले, एका वृत्तपत्राने माझे वक्तव्य म्हणून जी बातमी छापली ती निराधार आहे. मी असं कुठेही म्हटलेलो नाही. या मुलाखतीचा व्हिडीओ यूट्युबवर उपलब्ध आहे. आपण हा व्हिडिओ पाहिला तर  वस्तुस्थिती लक्षात येईल. असे देशमुख यांनी सांगितले.

संबंधित विषय