भूरट्या चोरांची सवय काही सुटेना...

चोरी केल्यानंतर या तिघांना अनेकदा पोलिसांनी विविध गुन्ह्यात अटक केली होती. माञ जामीनावर बाहेर आल्यानंतर हे तिघे ही पून्हा चोऱ्या करण्यास सुरूवात करायचे.

भूरट्या चोरांची सवय काही सुटेना...
SHARES
चोरी करण हे काही चोरांच्या स्वभावाचा भाग होऊन जातो. त्यामुळे त्याला किती ही शिक्षा झाली, तरी सवय माञ त्याची सुटत नाही. अशाच 3 आरोपींना मुंबईच्या गुन्हे शाखा 3 च्या पोलिसांनी अटक केली आहे. नूर मोहम्मद करीम शेख उर्फ लड्डू (44), सैद हुसेन नूर इस्लाम शेख उर्फ बटला ( 24), सलीम हुसेन शेख (27) अशी या आरोपींची नावे आहेत. यातील नूर हा आरोपी महिनाभरापूर्वीच जेल मधून शिक्षा भोगून आला होता. माञ सुटल्यानंतर त्याने त्या महिन्यात तब्बल 17 ठिकाणी घरफोड्या केल्याचे तपासात पुढे आले आहे.

जेलमधून सुटल्यानंतर पून्हा करायचे चोऱ्या

 मुंबई शहरामध्ये रात्रीच्या वेळेस दुकानांचे शटर तोडून चोरीच्या घटना घडलेल्या होत्या. या संदर्भात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 3 चे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली  निरीक्षक नितीन पाटील, पोलिस उपनिरीक्षक नवनाथ उगडे, पोलिस हवालदार गणेश गोरेगावकर, दिपक चव्हाण, शिवाजी जाधव,  मंगेश  पवार, आकाश मांगले, राहुल अनभुले, वैभव बिडवे, भास्कर गायकवाड हे आरोपींच्या शोधात होते. गुन्हे शाखेचे पोलिस 21 सप्टेंबर रोजी राञी गस्तीवर असताना. भायखळा येथील हेरिटेज एस ब्रिजवर तीन संशयित जण दुचाकीवर घुटमळताना दिसले. पोलिसांनी तिघांना हटकले असता. ते दुचाकीहून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना पाठलाग करून पकडले. चौकशीत लड्डू गँगमधील या टोळीचा म्होरक्या नूर मोहम्मद करीम शेख उर्फ लड्डू ( 44) हा होता. नूरवर  मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी 70 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले.

गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

चौकशीत या तिघांनी महिन्याभरात मुंबईत विविध ठिकाणी केलेल्या 15 गुन्ह्यांची कबूली दिली आहे.  चोरी केल्यानंतर या तिघांना अनेकदा पोलिसांनी विविध गुन्ह्यात अटक केली होती. माञ जामीनावर बाहेर आल्यानंतर हे तिघे ही पून्हा चोऱ्या करण्यास सुरूवात करायचे. या तिघांच्या चौकशीतून मुंबईसह इतर शहरांमधील अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वर्तवली आहे.

संबंधित विषय