सॉरी डार्लिंग बोलून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

  Malvani
  सॉरी डार्लिंग बोलून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न
  मुंबई  -  

  मालवणी - आजमीनगर परिसरात बुधवारी रात्री पतीने पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर ऑस्कर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी तिचा नवरा सादाब अली इरशाद याला अटक केली आहे आणि पुढचा तपास सुरू आहे.

  अजमर कम्पाऊंडमध्ये सादाब आणि त्याची पत्नी शमीमा सुल्तान रहात होते. दोघांना 2 मुले होती. रोजगार नसल्याने सादाब शमीमाकडे वारंवार पैसे मागायचा. त्यामुळे दोघांच्यात वाद व्हायचे. यामुळे 25 वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. पण सादाब शमीमाकडून पैशांची मागणी करायचा. वेगळे होऊनही सादाब शमीमाच्या घरी यायचा. बुधवारी रात्रीही सादाब शमीमाच्या घरी आला होता. नाराज शमीमाची समजूत काढण्यासाठी त्याने चिकन बिर्यानी बनवली होती. पण कामावरून घरी आलेली शमीमाने किचनमध्ये प्रवेश करताच सादाबने तिच्या अंगावर उकळते तेल फेकले आणि सॉरी डार्लिंग बोलून तो पसार झाला. शमीमाचा आवाज ऐकून शेजारच्यांनी तिच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार उघड झाला. सुरुवातीला तिला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांचा संप असल्याने तिला ऑस्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.