रवी पुजारीच्या हस्तांतरणास 'या' कारणामुळे लागणार विलंब


SHARE

कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी विलंब लागण्याची शक्यता आहे. कारण रवी पुजारीनं आपली ओळख नाकारली आहे. मी रवी पुजारी नसून अँथनी फर्नांडिस आहे, असा दावा केलाय.


हस्तांतरणासाठी भारताचे प्रयत्न

मुंबई आणि कर्नाटक पोलिसांच्या विनंतीवरून इंटरपोलनं त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. नोटीस जारी केल्याच्या दोन आठवड्यानंतर आफ्रिकेतील सेनेगल इथून त्याला अटक करण्यात आली. रवी पुजारील भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय प्रयत्न करत आहे. पण मी रवी पुजारी नाही. माझं नाव अँथनी फर्नांडिस असून मी सेनेगलचा नागरिक असल्याचा दावा केलाय.


डीएनए तपासणी होणार

त्यानुसार पुजारीच्या वकिलानं सेनेगलच्या अधिकाऱ्यांकडे पुरावा म्हणून पासपोर्ट जमा केला आहे. भारतानं देखील पुजारीची ओळख पटवून देण्यासाठी आणखी पुरावे गोळा करण्यासाठी सेनेगल अधिकाऱ्यांकडे वेळ मागितली आहे. याशिवाय रवी पुजारीच्या कुटुंबियांचे डीएनए नमुने घेऊन ते तात्काळ सेनेगलला पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. रवी पुजारीच्या दोन बहिणी भारतात राहतात. त्यांच्या डीएनए नमुन्यानुसार पुढचा तपास करण्यात येईल.


रवी पुजारीने अनेक अंडरवर्ल्ड डॉनसोबत काम केलं आहे. माञ कालांतराने कुणाशी ही न जमल्याने त्याने दोन दशकांपूर्वी स्वत:ची टोळी उभी केली. मुंबईत दहशत निर्माण करण्यासाठी त्याने पहिल्यांदा बाँलीवूडला टार्गेट केले. दिग्दर्शक महेश भट यांच्या घरावर ही चर्चेत येण्यासाठी त्याने गोळीबार केला होता. त्याच्यावर अनेक देशांमध्ये खंडणी तसंच हत्येचे गुन्हे दाखल आहेत. महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांनी रवी पुजारीच्या दोन हस्तकांना अटक केली होती. विलिअम रॉड्रिक्स आणि आकाश शेट्टी अशी त्यांची नावे आहेत. या दोघांवर मुंबई पोलिसांनी या वर्षातला पहिला मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.हेही वाचा

मुंबईतील दुहेरी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड हानिफ सईदचा मृत्यूसंबंधित विषय
ताज्या बातम्या