मुंबईतील दुहेरी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड हानिफ सईदचा मृत्यू


SHARE

मुंबईत 2003 मध्ये गेट वे आणि झवेरी बाजार इथं झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइड हानिफ सईदचा शनिवारी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. मृत हानिफचे वय हे 56 होते. हानिफ आणि त्याची पत्नी हे सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. हानिफच्या मृत्यूची माहिती त्याच्या मुंबईत राहणाऱ्या मुलाला देण्यात आली असल्याची माहिती जेल प्रशासनानं दिली आहे


कोण होता हानिफ ?

मुंबईत 2003 मध्ये गेटवे आणि झवेरी बाजार इथं झालेल्या भीषण बॉम्ब हल्ल्यात जवळपास ५२ जणांचा मृत्यू झाला होता. तर २४४ जण जखमी झाले होते. गुजरातमध्ये झालेल्या दंगलींचा बदला घेण्यासाठी हे स्फोट घडवल्याची कबूली देखील हानिफनं दिली होती. 2012 मध्ये उच्च न्यायालयानं हानिफसह त्याची पत्नी अशरात अन्सारी या तिघांना POTA म्हणजेच (Prevention of Terrorist Activity) अंतर्गत दोषी ठरवलं होतं. दोघांना मृत्यूदंड आणि आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. या दोघांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं होतं


नेमकं काय घडलं?

शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता हानिफच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्याला जेलमधील डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र त्याची प्रकृती ढासळत असल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. मात्र उपचारासाठी हानिफला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हानिफच्या मृत्यूची माहिती त्याच्या मुलाला देण्यात आल्याचं जेल प्रशासनाकडून सांगितलं.


हृद्याविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू?

हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण, तरीही शवविच्छेदनाच्या अहवालातूनच त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. हा अहवाल त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत सादर करण्यात येणार आहे. शवविच्छेदन आणि इतर सर्व कारवाई पूर्ण झाल्यानंतरच त्याच्या नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहितीही कारागृह अधिक्षक राणी भोसले यांनी दिली.हेही वाचा

पोलिसानेच केला पीडितेवर बलात्कार

३९ कोटिंच्या कोकेनसह परदेशी तस्कर अटकेतसंबंधित विषय
ताज्या बातम्या