हेरगिरी प्रकरणात आरोपीने केली होती नेपाळवारी

या हेरगिरीसाठी आतापर्यंत त्याला ११ लाखांचा फायदा झाल्याचे ही तपासात पुढे आले आहे.

हेरगिरी प्रकरणात आरोपीने केली होती नेपाळवारी
SHARES

भारत आणि चीनमध्ये दिवसेंदिवस संबध खराब होत असताना. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच बेकायदा टेलिफोन एक्सचेंजद्वारे हेरगिरी प्रकरणात आरोपीने चीनच्या सांगण्यावरून नेपाळ ट्रीप केल्याचे पुढे आले आहे. या हेरगिरीसाठी आतापर्यंत त्याला ११ लाखांचा फायदा झाल्याचे ही तपासात पुढे आले आहे. या नेपाळवारीबाबत आरोपी समर्पक उत्तर देऊ शकलेला नसून टेलिफोन एक्सचेंजच्या माध्यमातून लष्करी तळांवरही दूरध्वनी करण्यात आल्याचा संशय  पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईच्या गोवंडी परिसरातून अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजद्वारे हे गुप्तहेर जम्मू काश्मिरमधल्या, आर्मीच्या हालचालींची माहिती द्याचया, तो प्रामुख्याने दुबई, पूच्छ आणि राजोरी परिसरातील माहिती या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजच्या मदतीने पाकिस्तानमध्ये पुरवायचा, मध्यप्रदेश व छत्तीसगडमधील दोन क्रमांकाच्या सहाय्याने हे सर्व दूरध्वनी डायवर्ट करण्यात आले आहेत.  याबाबत जम्मू काश्मिर पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला कळवल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी १९१ सिमकार्ड असलेली मशीन, लँपटाँप, मोबाइल आणि इतर साहित्य हस्तगत केली आहेत. या आरोपीचा ताबा आता 'एनआयए' तपाय यंञणेकडे सोपवण्यात आले आहे. समीर अलवारी (३८) असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी सराईत असून मागील आठ महिन्यांपासून तो हे बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजद्वारे हेरगिरी करत असल्याचे तपासात पुढे आले आहे. या आठ महिन्यात त्याने चीन आणि पाकिस्तानमधून ३० लाख फोन डायवर्ट केल्याचे पुढे आले असून भारताचा २० कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचे तपासात पुढे आले आहे. या व्यवहारात त्याला ११ लाखांचा फायदा झाल्याचे कळते.

तपासात आरोपी समील अलवारी नेपाळला गेला आहे. या प्रवासाबाबत विचारले असता त्याने केणतेही समर्पक उत्तर दिले नसून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या टेलिफोन एक्सचेंज मार्फत 11 लाखांची कमाई करणा-या आरोपीने नेपाळ भेटीतच या सर्व व्यवहाराबाबत बैठक केल्याचा संशय आहे. पण अद्याप कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. या आठ महिन्यात आरोपीने परदेशी दूरध्वनी अथवा व्हिओआयपी दूरध्वनी या बेकायदा एक्‍स्चेंजच्या माध्यमातून वळवले आहेत. सिम बॉक्‍स आणि इंटरनेटच्या माध्यमातून सर्व्हरवर घेऊन हे कॉल संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवले जात असल्याने त्यांची नोंदही होत नव्हती. तसेच ज्या व्यक्तीला दूरध्वनी केले जातात त्याला भारतीय मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनी आला असल्याचे वाटायचे. त्यामुळे या बेकायदा यंत्रणेचा वापर करून पाकिस्तानी यंत्रणांनी भारतीय लष्करी तळांमधील माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे का, याबाबत तपास सुरू आहे. आरोपीच्या खात्यावर चीनी साथीरादारकडून काही पैसेही जमा झाले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा