भारतीय नौदलाची हेरगिरी करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबईतून अटक

मुंबईतून पकडण्यात आलेला आरोपी मोहम्मद हरून लकडावाला हा आरोपी पाकिस्तानातील कराचीला बऱ्याच वेळा जाऊन आलेला आहे

भारतीय नौदलाची हेरगिरी करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबईतून अटक
SHARES
भारतीय पाणबुड्या, शस्त्रागारं, नौदलाची ठाणी अशी महत्त्वाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या मुख्य आरोपीस 'एनआयए'(NIA) ने  मुंबईतून अटक केली आहे. मोहम्मद हरून हाजी अब्दुल रेहमान लकडवाला (49) या आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणी एनआयए अधिकसतपास करत आहे.

भारताच्या विशाखापट्टणम या नौदलाच्या तळावर हेरगिरी प्रकरणी  नोव्हेंबर 2019 मध्ये 11 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. पाकिस्तानसाठी हेर गिरी करणारे हे 11 जण ओळख बदलून नौदलात कार्यरत होते. भारताच्या नौदलातील अति संवेदनशील माहिती ते  फेसबुक, व्हॉट्सअ‌ॅपच्या माध्यमातून लकडावालाला पुरवत होते. लकडावाला ती माहिती पाकिस्तानला पुुरवत होता. याप्रकरणात पूर्वी एका पाकिस्तानी वंशाच्या शैस्ता कैसर नावाच्या व्यक्तीस अटक करण्यात आली होती. मुंबईतून पकडण्यात आलेला आरोपी मोहम्मद हरून लकडावाला हा आरोपी पाकिस्तानातील कराचीला बऱ्याच वेळा जाऊन आलेला आहे. कराचीला क्रॉस बॉर्डर ट्रेडच्या नावाखाली हा आरोपी त्याच्या हँडलरला भेटण्यास जात होता.

 यावेळी तो पाकिस्तानी गुप्तहेर अकबर उर्फ अली, रिजवाण यांना भेटत होता. मोहम्मद हरून लकडावालाच्या माध्यमातून नौदलाच्या 11 आरोपींच्या बँक खात्यात पैसे भरण्यात येत होते. एनआयएने मोहम्मद हरून लकडावाला याला अटक करतेवेळी त्याच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्र व डिजिटल डिव्हाईस जप्त केले आहेत.






संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा