SHARE

बोरी मोहल्ला - घरफोडी प्रकरणी जे.जे पोलिसांनी एका गुन्हेगाराला अटक केलीय. सोमवारी पहाटे दोन टाकी येथील चोर बाजार, बोरी मोहल्लामधील मटण स्ट्रीट गल्लीत घरफोडीचा प्रकार घडला होता. चोराने घरफोडी करुन २ लाख ६५ हजार रूपये लंपास केलेत. या प्रकरणी जे.जे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. २४ तासांच्या आत पोलिसांना फारूख युसुफ खानला पकडण्यात यश आलं. आरोपीला बुधवारी पोलीस कोठडी देण्यात आली. त्याच्याकडून 50,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस अधिकारी प्रविण फरतळे करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या