रोहित चिल्लर अटकेत...

 Mumbai
रोहित चिल्लर अटकेत...

मुंबई - भारताचा स्टार कबड्डीपटू रोहित चिल्लरला पत्नी ललिताच्या आत्महत्येप्रकरणी अटक केलीये. दिल्ली पोलिसांच्या पथकाने मुंबईत चिल्लरला अटक केली. रोहितचे वडील विजय यांनीही पोलिसांसमोर शरणागती पत्करलेली. मात्र रोहितने आपण पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी निर्दोष असल्याचा दावा केला आहे. आपण तिचा हुंड्यासाठी कधीच छळ केला नाही, आपल्यावर लागलेले सर्व आरोप चुकीचे आहेत, असं रोहितने म्हटलय. रोहितच्या पत्नीने आत्महत्येपूर्वी ऑडिओ क्लीप आणि सुसाईड नोटच्या माध्यमातून रोहित आणि त्याच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप केले होते. रोहीतने फेसबुक पोस्टच्या माध्यमातूनही आपण निर्दोष असल्याचा दावा केलाय.‘माझं ललितावर मनापासून प्रेम होतं. मी तिच्याशी प्रतारणा केली नाही. मी तिला कधीच त्रास दिला नाही.’ असं त्याने त्या पोस्टमध्ये म्हटलय.

Loading Comments