बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार तेलगीचा मृत्यू


बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार तेलगीचा मृत्यू
SHARES

बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचा (५६) गुरूवारी दिर्घ आजाराने मृत्यू झाला. आठवड्याभरापासून तेलगी बंगळुरूच्या व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. गुरुवारी शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

तेलगीवर एचआयव्ही एड्सचे देखील उपचार होत असल्याचं समजतंय.काही दिवसांपूर्वी जेलमध्ये बेशुद्ध पडल्यावर तेलगीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर कित्येक वर्षांपासून मधुमेह आणि हायपरटेन्शनने तेलगी त्रस्त होता.


२००१ मध्ये अटक

हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याप्रकरणी नोव्हेंबर २००१ साली अब्दुल करीम तेलगीला अजमेर येथे अटक करण्यात आली होती. तेव्हापासून बंगळुरूच्या परापन्ना आग्रहारा सेंट्रल जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं. तब्बेत खाल्यावल्याने जेलमध्ये त्याला मदतनीस देखील देण्यात आला होता.


मोठ्या नेत्यांची नावं

दोन दशकांपूर्वी समोर आलेल्या बनावट मुद्रांक घोटाळ्याने विशेष करून महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. तेलगीने आपल्या कबुलीजबाबात छगन भुजबळ यांच्यासह महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची नावे घेतल्याने हे संपूर्ण प्रकरण बरच गाजलं होतं. जून २००३ साली पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.


देशभरात ३९ गुन्ह्याची नोंद

तर, तपासादरम्यान मुंबईच्या कफ परेड येथून ८०० कोटी रुपयांचे आणि भिवंडीतून २,२०० कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी एकट्या टेलगी विरोधात देशभरात ३९ गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

तेलगीला २००७ साली दोषी ठरवण्यात आलं. या प्रकरणी तेलगीला ३० वर्षांच्या तुरुंगवासासह २०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा