प्रियकराने 'तिचे' अश्लील फोटो टाकले फेसबुकवर

प्रेमाचा दिखावा करत कोलकत्ता येथील तरुणाने तरुणीवर बलात्कार केला. तिचे अश्लील फोटो फेसबुकवर टाकण्याची धमकी देऊन तिला लाखो रुपयांना लुटलं.

प्रियकराने 'तिचे' अश्लील फोटो टाकले फेसबुकवर
SHARES

अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून प्रेम करणं हे  २८ वर्षीय तरुणीला चांगलंच महागात पडलं. प्रेमाचा दिखावा करत कोलकत्ता येथील ३१ वर्षीय या तरुणाने तरुणीवर बलात्कार केला. तसंच तिचे अश्लील फोटो फेसबुकवर टाकण्याची धमकी देऊन तिला लाखो रुपयांना लुटलं.  या प्रकरणी चेंबूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी कोलकत्ता येथून ज्युनिअर स्टुअर्ट गुहा याला अटक केली. 


मैत्रीचं रुपांतर प्रेमात 

चेंबूर परिसरात राहणाऱ्या तरुणीच्या वडिलांना २०१६ मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याच वेळी गुहाच्या वडिलांना कर्करोगावरील उपचारासाठी त्या रुग्णालयात अाणलं होतं. यावेळी तरुणीची ओळख गुहाशी झाली होती. कालांतराने दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जानेवारी २०१७ मध्ये गुहाच्या वडिलांचं निधन झाल्याने गुहा वडिलांवरील अंत्यसंस्कारासाठी त्याच्या कोलकत्ता येथील दुर्गापूर कालीथाला या गावी गेला. त्यानंतर दोघेही सोशल मिडियावरून एकमेकांच्या संपर्कात होते. मार्च महिन्यात गुहाचा वाढदिवस असल्याने तो मुंबईला आला होता.  दोघे लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी गुहाने तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तो अापल्या गावी पुन्हा गेला.


अश्लील चित्रीकरण

कोलकाताला गेल्यानंतर गुहाने फोन करून तरुणीजवळ व्यवसायासाठी व घर घेण्यासाठी पैशांची मागणी केली. तरुणीने सुरूवातीला त्याला २ लाख ४४ हजार रुपये दिले. त्यानंतर पुन्हा गुहाने मागितल्यानुसार तिने ८० हजार रुपये दिले. कालांतराने गुहा तरुणीवर संशय घेऊ लागला. त्यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. गुहाचा संशय दूर करण्यासाठी तरुणीने रागात स्वत:चा मोबाइल क्रमांक कुरिअरने गुहाला पाठवला. त्यावेळी गुहाने तरुणीचे फेसबुक व जीमेल अकाऊंट हॅक करून पासवर्ड बदलला. त्यानंतर तो पुन्हा मुंबईत आला व तरुणीला लोणावळा येथे घेऊन गेला. त्यावेळी गुहाने त्याच्या मोबाइलमध्ये तरुणीचे अश्लील चित्रीकरण केले.


अश्लील फोटो फेसबुकवर

कालांतराने तरुणीने लग्नासाठी तगादा लावल्यावर गुहा तिला टाळू लागला. तिच्या घरी गुहाने प्रेमसंबधांबाबत सांगितले. यानंतर कुटुंबियांनी तिला लांब राहण्यास सांगितल्यानंतर गुहाने  तिचे अश्लील फोटो तिच्याच फेसबुकवरून अपलोड केले. याबाबतची माहिती तरुणीच्या नातेवाईकांनी तिला दिल्यानंतर तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिची बदनामी करण्यासाठी तो वारंवार फोटो अपलोड करून डिलीट करत होता. या त्रासाला कंटाळलेल्या तरुणीने जून महिन्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार चेंबूर पोलिसांनी गुहाला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.हेही वाचा -

आयपीएल बेटिंग प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक

सेल्फी बेतली जीवावर, वाचा नेमकं काय झालं?


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय