सेल्फी बेतली जीवावर, वाचा नेमकं काय झालं?

सेल्फी काढण्याच्या मोहापायी मरीन ड्राईव्ह येथे एका 12 वर्षाच्या मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. अल्ताफ शेख शनिवारी ईद साजरी करण्यासाठी मरिन ड्राइव्हच्या समुद्र किनारी गेला. मात्र याची माहिती त्याने कुटुंबियांना दिली नव्हती. अखेर संध्याकाळी मरिन ड्राईव्हच्या पोलिसांना त्याचा मृतदेह आढळून आला.

सेल्फी बेतली जीवावर, वाचा नेमकं काय झालं?
SHARES

समुद्रात उतरून सेल्फी काढू नका, अशी धोक्याची सूचना वारंवार दिली जाते. अनेक ठिकाणी पोलिसांनी सेल्फी काढण्यावर बंदीही घातली आहे. असं असतानाही समुद्रात उतरून सेल्फी काढण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. सेल्फी काढण्याच्या याच मोहापायी मरीन ड्राईव्ह येथे एका 12 वर्षाच्या मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे.


शनिवारची घटना

12 वर्षाचा अल्ताफ शेख शनिवारी ईद साजरी करण्यासाठी मरिन ड्राइव्हच्या समुद्र किनारी गेला. मात्र याची माहिती त्याने कुटुंबियांना दिली नव्हती. अखेर संध्याकाळी मरिन ड्राईव्हच्या पोलिसांना त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर याची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार समुद्रात उतरून सेल्फी काढत असताना बुडून त्याचा मृत्यू झाला आहे.


आणि तो गायब झाला

अल्ताफ शेख हा ट्रॉम्बे येथील राहणारा आहे. शनिवारी ईद असल्याने तो सकाळी लवकर उठला आणि नमाज अदा करण्यासाठी मशिदीत गेला. नमाज अदा करून घरी परतल्यानंतर तो बाहेर फिरायला गेला. त्याच्या आईवडिलांनी त्याला अखेरचं खेळतानाच पाहिलं होतं. मात्र त्यानंतर तो गायब झाला.


अल्ताफचा बुडून मृ्त्यू

संध्याकाळ झाली तरी अल्ताफ घरी काही परतला नव्हता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी मुलगा हरवल्याची तक्रार ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात केली. काही वेळानंतर मरिन ड्राईव्ह येथे अल्ताफचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. अल्ताफचे काका सादिक शेखने सांगितलं की, त्यांना तीन मुलांचे फोटो दाखवण्यात आले होते. आणि त्यापैकीच एक अल्ताफ होता. त्यानंतर अल्ताफच्या कुटुंबियांना जीटी रुग्णालयात पाठवण्यात आलं. तेव्हा अल्ताफचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याचं उघड झालं.

मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत रविवार दुपारी मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला.


हेही वाचा -

पालघरच्या केळवे समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा