गेट वे आॅफ इंडिया इथं आढळला मृतदेह


गेट वे आॅफ इंडिया इथं आढळला मृतदेह
SHARES

गेट वे आॅफ इंडियाजवळील समुद्रात रविवारी सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मृतदेह सोमवारी सकाळी बाहेर काढण्यात अग्निमन दल आणि पोलिसांना यश आलं. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून कुलाबा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्याच्या नातेवाईकाचा शोध घेतला जात आहे.


कधी आढळला मृतदेह?

कुलाबाच्या गेट वे आॅफ इंडिया जवळील दगडांमध्ये रविवारी सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. बहुदा ३ ते ४ दिवसांपासून तो मृतदेह तिथं वाहून आलेला असावा. मात्र हा मृतदेह दगडांमध्ये अडकून राहिल्याने त्याच्याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही. परंतु रविवारी सकाळी मृतदेहाच्या उग्र वासामुळे परिसरात येणाऱ्याचं तिथं लक्ष वेधलं गेलं.


दगडात अडकल्याने अडचण

दगडांमध्ये मृतदेह आढळल्याची माहिती कुलाबा पोलिस आणि अग्निशमन दला मिळाल्यानंतर त्यांनी हा मृतदेह दगडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मृतदेह दगडात अडकल्यामुळे आणि पावसाची रिपरिप सुरू असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना हा मृतदेह बाहेर काढण्यास अपयश येत होतं.

अखेर सोमवारी पहाटे समुद्राला आलेल्या भरतीमुळे मृतदेह आपसूकच पाण्यावर तरंगू लागला. त्यानंतर कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून पोलिस त्यांच्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत.हेही वाचा-

एक्स्प्रेसच्या धडकेत २ दुचाकीस्वार ठार

तरुणाची लोकलसमोर उडी टाकून आत्महत्याRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा