एक्स्प्रेसच्या धडकेत २ दुचाकीस्वार ठार

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकाजवळ दोघे तरुण दुचाकीवरून रेल्वे रुळ ओलांडत होते. दरम्यान एक्स्प्रेसची धडक बसल्याने दोघेही जागीच ठार झाले.

  • एक्स्प्रेसच्या धडकेत २ दुचाकीस्वार ठार
  • एक्स्प्रेसच्या धडकेत २ दुचाकीस्वार ठार
SHARE

रविवारी हार्बर रेल्वे मार्गावरील गोवंडी स्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडत असताना लोकलच्या धडकेत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता अशीच आणखी एक घटना दिवा स्थानकाजवळ घडली आहे. मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकाजवळ दोघे तरुण दुचाकीवरून रेल्वे रुळ ओलांडत होते. दरम्यान एक्स्प्रेसची धडक बसल्याने दोघेही जागीच ठार झाले.तपास सुरू

दिवा स्थानकाजवळ सोमवारी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास दोन तरुण दुचाकीवरून रेल्वे रुळ ओलांडत होते. यावेळी एक्स्प्रेसची धडक बसल्याने या दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दोघांचं नाव अद्याप समजलेलं नसून रेल्वे पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

IMG-20180618-WA0010.jpg

गोवंडी स्थानकाजवळ अपघात

रविवारी हार्बर मार्गावरील गोवंडी स्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडत असताना लोकलची धडक बसल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र त्या व्यक्तीला लोकलखालून बाहेर काढेपर्यंत कुर्ल्याहून पनवेलकडे जाणारी लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.


हेही वाचा -

तरुणाची लोकलसमोर उडी टाकून आत्महत्या

संबंधित विषय
ताज्या बातम्या