तरुणाची लोकलसमोर उडी टाकून आत्महत्या


तरुणाची लोकलसमोर उडी टाकून आत्महत्या
SHARES

धावत्या लोकलसमोर उडी घेत एका तरुणाने आयुष्य संपवल्याची घटना मालाड स्टेशवर 12 जून रोजी सकाळी 8 वाजून 28 मिनिटांनी घडली. मात्र या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी सोमवारी जारी केलं आहे.काय आहे या व्हिडिओत?

पोलिसांनी जारी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती आधी पायऱ्या उतरून स्टेशवर येताना दिसत आहे. ही व्यक्ती प्लॅटफॉर्मच्या एका टोकहून चालत येते आणि लोकल येताच क्षणाचाही विलंब न करता लोकसमोर उडी घेते. ज्यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 12 जून रोजी सकाळी 8 वाजून 28 मिनिटांनी घडली आहे. महत्त्वाचं म्हणजे घटना घडलेल्या 6 दिवसानंतरही या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही.

ही लोकल मालाडहून चर्चगेटच्या दिशेने जात होती. मात्र त्या व्यक्तीने आत्महत्या का केली याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या पश्चिम रेल्वेकडून या घटनेचा तपास सुरू आहे.


हेही वाचा - 

ट्रॅक ओलांडताना प्रवाशाला अपघात, हार्बरसेवा ठप्प

अज्ञात व्यक्तीने ओव्हरहेड वायरवर वस्तू फेकली, म.रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा