Advertisement

ट्रॅक ओलांडताना प्रवाशाला अपघात, हार्बरसेवा ठप्प

हार्बर मार्गावरील गोवंडी स्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडत असताना लोकलची धडक बसल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचं नाव अद्याप समजलेलं नसून त्याला लोकलखालून बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. परिणामी कुर्ल्याहून पनवेलकडे जाणारी लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

ट्रॅक ओलांडताना प्रवाशाला अपघात, हार्बरसेवा ठप्प
SHARES

आधीच मेगाब्लॉक, त्यात पाऊस अशात गोवंडी स्थानकाजवळ एका प्रवाशाचा अपघात झाल्याने हार्बर सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अपघातामुळे हार्बरची मेगाब्लॉक नसलेली वाहतूकही बंद झाली आहे. 

गोवंडी स्थानकाजवळ अपघात

हार्बर मार्गावरील गोवंडी स्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडत असताना लोकलची धडक बसल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचं नाव अद्याप समजलेलं नसून त्याला लोकलखालून बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. परिणामी कुर्ल्याहून पनवेलकडे जाणारी लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

तरीही अपघात थांबेना

मुंबईची लाइफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमधून दररोज १ कोटीपेक्षा जास्त प्रवासी उपनगरीय लोकलमधून प्रवास करतात. मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गांवर दररोजच्या प्रवासात वेळ वाचवण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात, इतकेच नाही तर अनेकदा चालती लोकल पकडतात आणि अनेक जण लोकलच्या दारात उभे राहतात. यामुळे विविध अपघातांना आमंत्रण मिळतं. रेल्वे प्रशासनने अनेक उपाययोजना करूनही हे अपघात काही थांबताना दिसत नाही. 

हेही वाचा -

लोकलच्या टपाचा प्रवास ठरला जीवघेणा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा