Advertisement

पालघरच्या केळवे समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू

पालघर तालुक्यातील केळवे बीचवर नालासोपारा येथून पर्यटनासाठी आलेल्या चार जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. या चौघांचं नाव अद्याप समजलेलं नाही. यामध्ये एकाचा मृतदेह हाती लागला असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.

पालघरच्या केळवे समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू
SHARES

पावसाळ्यात पर्यटक पावसाचा आनंद घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनारी गर्दी करतात. मात्र समुद्र किनाऱ्यावर मजा-मस्ती करताना खोलीचा अंदाज न आल्याने काहींचा समुद्रात बुडून मृत्यू होतो. अशीच घटना रविवारी पालघर तालुक्यातील केळवे बीचवर घडली आहे. 


'या'चौघांचा मृत्यू

पालघर तालुक्यातील केळवे बीचवर नालासोपारा पूर्व येथील संतोष भुवन येथून ७ जण केळवे समुद्रावर फिरायला आले होते. या ७ जणांपैकी चार जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. दिपेश दिलीप पेडणेकर (१७), श्रीतेज नाईक (१५), तुषार चिपटे (१५) आणि दिपक परशुराम चालवाडी (२०) असं या तरुणांची नावं असून दिपक याचा मृतदेह सापडला आहे. तसेच तिन जणांचा शोध सुरू आहे.


तिघांचा शोध सुरू

पावसाचा आंनंद घेण्यासाठी नालासोपारा येथून एकूण ७ जण फिरायला आले होते. या ७ जणांपैकी गौरव भिकाजी सावंत (१७), संकेत सचिन जोगले (१७) आणि देविदास रमेश जाधव (१६) हे या दुर्घटनेत बचावले, तर दिपेश दिलीप पेडणेकर (१७), श्रीतेज नाईक (१५), तुषार चिपटे (१५) आणि दिपक परशुराम चालवाडी (२०) हे चौघे जण बुडाले आहेत. यामध्ये दिपकचा मृतदेह हाती लागला असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. सध्या पावसाळा सुरू असून समुद्र खवळलेला असताना खोल पाण्यात गेल्याने चौघे पर्यटक बुडाल्याची माहिती मिळते.


हेही वाचा - 

दुर्देवी! रत्नागिरीच्या समुद्रात बुडून बोरीवलीतील ५ जणांचा मृत्यू

वांद्रे समुद्रातलं फ्लोटिंग रेस्टॉरंट बुडालं

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा