दुर्देवी! रत्नागिरीच्या समुद्रात बुडून बोरीवलीतील ५ जणांचा मृत्यू

दुपारी दीडच्या सुमारास बोरीवलीतील ६ पर्यटक पोहण्यासाठी आरेवारेच्या समुद्रात उतरले नि हे सहाही जण बुडाले.

दुर्देवी! रत्नागिरीच्या समुद्रात बुडून बोरीवलीतील ५ जणांचा मृत्यू
SHARES

रत्नागिरीच्या आरेवारे समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या बोरीवलीतील आय सी काॅलनीत राहणाऱ्या डिसुजा कुटुंबातील ५ जणांचा रविवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. दुपारी दीडच्या सुमारास बोरीवलीतील ६ पर्यटक पोहण्यासाठी आरेवारेच्या समुद्रात उतरले नि हे सहाही जण बुडाले. या ६ जणांपैकी एकालाच वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं असून उर्वरित ५ जणांचा बुडून मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत पाचही जणांचे मृतदेह शोधण्यात पोलिस आणि बचाव पथकाला यश आलं आहे.  

मृतांमध्ये ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. पाण्याचा वेग जास्त असल्याने सर्व पाण्यात वाहून गेले.

रेंचर डिसुजा (१९), मॅथ्यू डिसुजा (१८), केनेथ डिसुजा (५४), मोनिका डिसुजा (४४) आणि सनोमी डिसुजा (२२) अशी मृतांची नावं आहेत. तर रिटा डिसुजा बचावल्या.


खोल पाण्यात उतरले अन्...

उन्हाळ्याच्या सुट्टीत समुद्र किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी मुंबईतून अनेकजण कोकणात जातात. त्याप्रमाणेच बोरीवलीतील आयसी काॅलनीतील काहीजण रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनाऱ्यावर भटकायला गेले आणि खोल समुद्रात उतरले.


स्थानिकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

या पर्यटकांचा उत्साह इतका होता की, ते समुद्रात खोल जाऊन पोहण्याचा आनंद घेत होते. पुढं जाऊ नका, जास्त खोल जाऊ नका, असं स्थानिक त्यांना बजावून सांगत होते. पण या पर्यटकांनी मौजमजेच्या नशेत स्थानिकांचा सल्ला धुडकावून लावला.


स्थानिकांची मदत तोकडी

अतिउत्साह नडल्यावर हे सहाही जण दुपारी दीडच्या सुमारास बुडू लागले. त्यांना बुडताना पाहताच स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केलं. त्यानंतर लागलीच बचाव पथक आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बोटीच्या सहाय्यानं या पर्यटकांना शोधण्याची मोहीम सुरू केली.

त्यात एका महिला पर्यटकाला वाचवण्यात पोलिस आणि बचाव पथकाला यश आलं. ५ पर्यटकांचे मात्र मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून त्यांची नावं अजून समजलेली नाही.



हेही वाचा-

असा खेळला जातो क्रिकेट सामन्यांवर सट्टा!

फेसबुकवर मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह मॅसेज, तरूणाला अटक



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा