फेसबुकवर मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह मॅसेज, तरूणाला अटक

गोरेगाव परिसरात टूर आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या अनिकेत पाटीलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता यांच्या विषयी फेसबुकवर अश्लील मॅसेज टाकला होता. त्यामुळे भावना दुखावल्या गेलेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी या दोघांविरोधांत जुहू पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा नोंदवला.

फेसबुकवर मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह मॅसेज, तरूणाला अटक
SHARES

फेसबुक या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या व्यक्तींविरोधात जुहू पोलिसांनी सोमवारी गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्यात बुधवारी पोलिसांनी गोरेगाव इथून सकाळच्या सुमारास अनिकेत पाटील सकाळी या तरुणाला अटक केली.


काय आहे प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात दौऱ्यावर असताना, राम सुब्रमण्यम नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिका केली होती. सुब्रमण्यम हे अॅड फिल्म मेकर असून त्यांनी निवडणुकीच्या काळात आम आदमी पक्षासाठी जाहिराती बनवल्या होत्या.


पदाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवला

तर, गोरेगाव परिसरात टूर आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या अनिकेत पाटीलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता यांच्या विषयी फेसबुकवर अश्लील मॅसेज टाकला होता. त्यामुळे भावना दुखावल्या गेलेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी या दोघांविरोधांत जुहू पोलिस ठाण्यात सोमवारी तक्रार नोंदवली होती.

पोलिसांनी भादंवि च्या २२८/१८ यू/एस १५३(अ), ५००, ५०१, ५०३, ५०५(२), ५०६(२), ५०९ आर/ डब्ल्यू ६७ आयटी कलमांतर्गत गुन्ह्यांची नोंद केली.

या तक्रारीनुसार कारवाई करत जुहू पोलिसांनी बुधवारी गोरेगाव परिसरातून अनिकेतला अटक केली. या प्रकरणी जुहू पोलिस अधिक तपास करत आहे.



हेही वाचा-

'मुंबईत दिवसाला ५०-६० सायबर गुन्ह्यांची नोंद'

इंटरनेटवरून मुलींचा पाठलाग, गुगलच्या कर्मचाऱ्याला अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा