इंटरनेटवरून मुलींचा पाठलाग, गुगलच्या कर्मचाऱ्याला अटक

इंटरनेटच्या माध्यमातून एका तरुणीचा पाठलाग करून तिचा अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी गुगलच्या टेक्निकल टीममध्ये कार्यरत असलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी अटक केली आहे.

इंटरनेटवरून मुलींचा पाठलाग, गुगलच्या कर्मचाऱ्याला अटक
SHARES

इंटरनेटच्या माध्यमातून एका तरुणीचा पाठलाग करून तिचा अश्लिल व्हिडिओ बनवल्याप्रकरणी गुगलच्या टेक्निकल टीममध्ये कार्यरत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी अटक केली आहे. अभिजीत विश्‍वजीत मुखर्जी असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.



डिंटर अॅपद्वारे पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट

मालाडमध्ये राहणारा अभिजित हा गुगल इंडिया कंपनीत टेक्‍निकल विभागात नोकरी करत असून गेल्या अनेक दिवसांपासून २६ वर्षीय तरुणाचा पाठलाग करत होता. पीडित तरुणीने आपल्या मोबाइलवरून एप्रिल महिन्यात टिंडर हे अॅप डाऊनलोड केलं होतं. या अॅपच्या मदतीने तिला अभिजितने जाॅन नावाच्या व्यक्तीने मैत्रीसाठीची रिक्वेस्ट पाठवली. दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाल्यानंतर अभिजीतनं तरुणीला हाजीअली इथं भेटण्यासाठी बोलावलं.


तरुणीच्या बँक डिटेल्सची माहिती 

या भेटीदरम्यान अभिजीतने तरुणीला सांगितले की, मी तुला २००९ पासून ओळखतो. तुझ्या प्रत्येक गोष्टीची माहीती माझ्याकडे आहे. तुझा २०१५-१६ सालच्या बँकेचा तपशीलही माझ्याकडे आहे. सुरुवातीला त्याच्या बोलण्यावर तरुणीचा विश्वास बसत नव्हता. मात्र अभिजीतने बँकेचे डिटेल्स सांगितल्यानंतर तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकली. घाबरलेल्या तरुणीने अभिजीतला खोटे कारण सांगून तेथून पळ काढ्ला. भीतीने टिंडर अॅप्लिकेशनही डिलिट केले. 



तरुणीला दिली धमकी

अभिजीतला आपली माहिती मिळाली कशी? हे जाणून घेण्यासाठी तरुणीनं ५ एप्रिलला त्याला पुन्हा भेटायला बोलावलं. त्यावेळी अभिजीतनं तिला आठ वर्षापासून पाठलाग करत असल्याचं सांगितलं. त्यानं त्यावेळी तिला प्रपोजही केला. एवढ्यावरच न थांबता त्याने तू मला नाकारलंस, तर मी दुसरं कुणालाही तुझ्या आयुष्यात येऊ देणार नाही, अशी धमकी दिली.


अश्लिल मॅसेजही पाठवले

त्यानंतरही आरोपीनं विविध ईमेल आयडी अाणि मोबाईल क्रमांकाच्या साहाय्याने तरुणीशी संपर्क साधला. फेसबुकवरील तरुणीच्या अकाऊंटवरून २०१६ मध्ये त्याने एका लिंकद्वारे अश्‍लील संदेश व नग्न छायाचित्र पाठवले होते. या प्रकरणी तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अभिजितला अटक केली. अभिजीतचे मोबाइल आणि सिमकार्ड पोलिसांनी हस्तगत केले असून अधिक तपास सुरू अाहे.


हेही वाचा -

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांकडून ओळखपत्राचा दुरुपयोग

मुंबईत फिरतायत अनेक नीरव मोदी!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा