'मुंबईत दिवसाला ५०-६० सायबर गुन्ह्यांची नोंद'

मेट्रो सिटी मुंबईत दिवसाला ५०-६० सायबर गुन्ह्याची नोंद होते. मुंबईला सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष पोलिसांचं सायबर पथक तयार करण्यात आलं असलं तरी वाढत्या गुन्ह्यांमुळे मुंबई पोलिसांची दमछाक होत असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी नोंदवलं.

'मुंबईत दिवसाला ५०-६० सायबर गुन्ह्यांची नोंद'
SHARES

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील गुन्हेगारीच्या वाढलेल्या प्रमाणाची आकडेवारी सादर करताना त्यांनी सायबर गुन्ह्याकडे लक्ष वेधलं. मेट्रो सिटी मुंबईत दिवसाला ५०-६० सायबर गुन्ह्याची नोंद होते. मुंबईला सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष पोलिसांचं सायबर पथक तयार करण्यात आलं असलं तरी वाढत्या गुन्ह्यांमुळे मुंबई पोलिसांची दमछाक होत असल्याचं मत पवार यांनी नोंदवलं.



तंत्रज्ञानातून नवीन गुन्ह्याचा जन्म

२१ व्या शतकात तंत्रज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे परंतु तंत्रज्ञानाने नवीन गुन्ह्याला जन्म दिला असून, त्याची सर्वाधिक झळ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला बसल्याचं पवार म्हणाले. ऑनलाईन सायबर गुन्ह्यामध्ये उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा क्रमांक येतो. राज्यात वर्षभरात ३ हजार २८० सायबर गुन्हयांची नोंद झाली आहे.


कॅशलेस असुरक्षित

सरकारने कॅशलेस सेवेसाठी आग्रह धरला आहे. पण, कॅशलेस व्यवहार सुरक्षित राहिलेले नाहीत. इंटरनेटच्या साहाय्याने लाखो रुपये पळवण्याचे गुन्हे घडत आहेत. मुंबईत दिवसाला ५० ते ६० सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल होतात. मेलवर स्पॅममेल येत आहेत, नेटबॅंकींग असेल, तर ग्राहकाचं पासवर्ड हॅक केलं जात आहे. कामाच्या ओघात किंवा वारंवार येणाऱ्या मेसेजला उत्तर देण्याच्या नादात ग्राहक सायबरच्या जाळयात फसतो, असंही ते म्हणाले.



हॅकींगचं प्रमाण वाढतं

सायबर गुन्ह्यांतील हॅकींगमध्ये ई-कॉमर्सचं प्रमाण राज्यात ३१ टक्के इतकं आहे. राज्यात व्हायरस अँटक होण्याचं प्रमाण ६० टक्के आहे. याचा अर्थ राज्यामध्ये बेकारीचं प्रमाणही वाढलं आहे. हाताला काम नसल्याने तरुण पिढी चुकीच्या रस्त्याने जात आहे.


तपासाबाबत अनास्था

सायबर गुन्ह्यांच्या तपासाबाबत कमालीची अनास्था पहायला मिळत आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी ४ सायबर पोलिस ठाणे उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यासाठी वांद्रे येथे जागाही संपादीत केली होती. या पोलिस ठाण्यासाठी उपायुक्त दर्जाचा पोलिस अधिकारीही नियुक्त केला होता. मुख्यमंत्र्याच्या घोषणेला दीड वर्ष झालं. परंतु सायबर ठाण्याचा अद्याप पत्ता नाही. निव्वळ जाहिरातबाजी आणि घोषणांमध्ये मश्गुल असलेलं हे सरकार कृती शून्य असल्याची टीका पवार यांनी केली.



हेही वाचा-

दिव्याखाली अंधार! आयएएस-आयपीएस रहिवासी टाॅवरमध्येच चालतो वेश्याव्यवसाय!!

अन् बीएसएफ हवालदाराचाच झाला पोपट!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा